Breaking News

कोपरगाव नगरपरिषद अंतर्गत पीएम स्वनिधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दहा हजार रुपये प्रमाणे कर्ज वितरण!

कोपरगाव नगरपरिषद अंतर्गत पीएम स्वनिधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दहा हजार रुपये प्रमाणे कर्ज वितरण


करंजी प्रतिनिधी :
    केंद्र व राज्य शासन नगरविकास विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कोपरगाव नगरपालिकेने आत्योदय योजना व राष्ट्रीय उपजीविका अभियान आणि कोपरगाव नगरपालिका यांच्या मार्फत शहरातील पाठविक्रेत्यांचे कायम हंगामी व तात्पुरता या गतात दि १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या दरम्यान बायोमेट्रिक पध्दतीने सर्वेक्षण करण्यात आले., या द्वारे एकूण १०४६ पथविक्रेत्यांचा नोंदी झाल्या.
       लॉकडाउन मुळे पाठविक्रेत्यांचे व्यवसाय बंद झाल्या सारखेच आहे. त्यामुळे त्यांना आपला व्यवसाय व कुटूंब सुरळीत पणे सुरू ठेवण्यासाठी भांडवल म्हणून पतपुरवठा बँका मार्फत करण्याचा सूचना प्राप्त झाल्या असल्याने पाठविक्रेत्याना सुष्म पतपुरवठा करण्याचा मार्गदर्शक सूचनेनुसार बँका मार्फत प्रति लाभार्थी रुपये १००००/- इतके कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कर्जास ७% व्याज अनुदान तसेच लाभार्थ्यांनी नियमित कर्ज फेड केले तर तर तीनमहिन्याला व्याज अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
       या योजनेचा लाभ प्रत्येक गरजूंना मिळावा या साठी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती द्वारे प्रत्येक लाभार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे.कोपरगाव शहरातील तब्बल ४५१ लाभार्थ्यांनी कर्ज मागणी साठी ऑनलाईन फॉर्म भरले होते त्या पैकी आज ११६ लाभार्थ्यांना संबंधित बँकांनी ऑनलाईन पध्दतीने मंजुरी देत आज प्रत्यक्षात ७६ लाभार्थ्यांना प्रत्येकी १००००/- रुपये  कर्जाचे वितरण पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, आय डी बी आय बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया या बँका मार्फत करण्यात आले.
       आज एक गाव एक गणपती ची आरती चा मान शहरातील बँक अधिकारी वर्गाला देण्यात आला या प्रसंगी म कर्जाचे प्रातिनिधिक स्वरूपात विविध  व्यवसायातील लाभार्थ्यांना कर्ज मजुरी पत्रकाचे वाटप करण्यात आले.
      या प्रसंगी  नगराध्यक्ष विजय वाहडणे,मुख्यधिकरी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी  सुनील गोर्डे,  मार्केट विभाग प्रमुख योगेश्वर खैरे, बांधकाम अभियंता दिगबर वाघ,लेखापाल तुषार नालकर,अभियंते रोहित सोनवणे, समाजकल्याण व माहिती जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, राजेंद्र गाढे, चंद्रकांत साठे, महारुद्र गालट,  रामनाथ जाधव, मारुती काटे,निलेश बुचकुले, राजेंद्र शिंदे तसेच पंजाब नॅशनल बँकेचे शंभू शंकर मुडी,रत्नेश सावेनर, बँक ऑफ इंडियाचे शीतल मटकर, सोनाली पाटील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे बी जे रंजन प्रसाद,राजेंद्र साबळे बँक ऑफ महाराष्ट्र चे मनोरंजन मोहनती अखिलेश दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी उर्वरित लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे.