Breaking News

लॉकडाऊनच्या संधीने फुल उत्पादक झाले लखपती !

लॉकडाऊनच्या संधीने फुल उत्पादक झाले लखपती!


सुनील गीते /अकोले प्रतिमिधी : 
गणेशोत्सवामुळे झेंडू व इतर फुलांची मागणी वाढली आहे यामुळे  सर्वच फुलांची भाव चांगलेच भडकले असून फुल उत्पादकांना यंदा न भुतो न भविष्यती अशी लॉटरी लागली आहे.  फुलांचे भाव गेल्या सहा सात दिवसांपासून दुपटी, तिपटीने वाढले बाजार भावाने  शंभरी ओलांडली आहे  श्रावण महिन्यातील पुजाअर्चा  व गणेशोत्सवामध्ये झेंडुच्या फुलांचा सर्वाधीक वापर असतो. 
लॉक डाउनमध्ये धार्मीक स्थळे बंद असल्याने फुल उत्पादकांच्या मनात बाजार भावाबद्दल साशंकता होती. त्यामुळे लॉकडाउन काळामध्ये फुलांची मागणी थेट शुन्यावर आल्यामुळे फुलांचे बाजार एप्रिल, मे, जुन पर्यंत निचांकी पातळीवर होते. जुलै महिन्यात भावात थोडीशी सुधारणा होत. गणेशस्थापनेपुर्वी भाव 150 ते 180 रुपये झाले. आजही भाव 100 रुपये चे पुढे  आहेत तर काही व्यापारी शेतकर्‍यांच्या बांधावरच थेट  150 ते 180 रुपये दराने फुले खरेदी करत आहे  फुल उत्पादकांना यंदा चांगलीच लॉटरी लागली आहे. इंदोरी, रुंभोडी परिसरातून दररोज सुमारे 15 ते 20 पिकअप झेंडु व शेंवतीच्या गाड्या  मुंबई व सुरतकडे जातात. पहिल्यांदाच इतके भाव मिळाल्याने फुल उत्पादक आनंदीत आहेत. 


यंदा लॉकडाउन मध्ये मंदिरेही बंद असताना छातीवर दगड ठेवून एक जूनला 20 गुंठे झेंडूची लागवड केली. झेंडू लागवडीच्यावेळी भाव निच्चांकी होते. जुलैच्या दुसर्‍या पंधरवाडयात बाजार वाढण्यास सुरुवात झाली. गणेशोत्सवात 160 रुपये किलोने व्यापार्‍यांनी बांधावरच माल खरेदी केला. आतापर्यंत 20 गुंठयांमध्ये तीन हजार किलो माल विकला असून जवळपास तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. झेंडूला इतके भाव यापुर्वी कधीही पाहिले नव्हते. घटस्थापना व दसर्‍यातही यावर्षी झेंडुला उच्चांकी भाव राहतील असा अंदाज आहे.
--------
-राजेंद्र देवराम मोहिते 
(फुल उत्पादक, शेतकरी)


या मागील वर्षीपेक्षा यावर्षी  बाजार भाव  चांगले मिळत असल्याने   धामणगाव पाट येथील झेंडू उत्पादक शेतकरी  दीपक चौधरी ,रावसाहेब भोर  रेवचंद भोर यांनी सांगितले 
 20 गुंठ्यात कलकत्ता जातीचे  झेंडू पिकात   चार तोड्यात सव्वा लाख रुपये उत्पन्न  मिळाले असून मला 90 ते 120 रुपये भाव  मिळाला   असेच भाव राहिले तर 20 गुंठया त   साडे तीन ते चार लाख रुपये उत्पन्न   मिळेल ---
-------
 दीपक चौधरी ( शेतकरी  )

मागील सलग दोन वर्षे फुलाना  5 ते 20 रुपये पर्यंत भाव मिळाले त्यात किमान खर्च वसूल झाला पण नफा मिळाला नाही यावर्षी   झेंडूला चांगले  बाजार भाव मिळत   आहे माझे कडे एक एकर  क्षेत्रात आष्टीगंध जातीचे फुले आहे  चार ते पाच तोडे आज पर्यत झाले प्रत्येक तोड्याला 100 जाळ्या निघत आहे   80 ते 90 रुपये पर्यत भाव मिळाला आहे  दिवाळी पर्यत भाव  टिकून राहिले तर चांगला फायदा  होईल असे धामणगाव पाट येथील शेतकरी रावसाहेब भोर यांनी सांगितले
----------