Breaking News

कोपरगाव तालुक्यात २७ रुग्णाची भर तर १४ कोरोना मुक्त !

कोपरगाव तालुक्यात २७ रुग्णाची भर तर १४ कोरोना मुक्त


करंजी प्रतिनिधी-
    कोपरगाव तालुक्यात दि २६ ऑगस्ट रोजी कोपरगाव कोविड
सेंटर मध्ये एकूण ९४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्या पैकी २२ अहवाल पॉजिटीव्ह तर ७२ अहवाल निगेटीव्ह आले तसेच नगर येथे पाठवलेल्या १४ अहवालपैकी २ बाधित तर १२ निगेटीव्ह त्याच बरोबर एका खाजगी लॅब च्या अहवालात ३ बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

 यात कोपरगाव शहरात १७ तर ग्रामीण भागात १० रुग्ण आढळून आले आहे.

निवारा - १
पंचायत  समिती जवळ - ४
गांधी नगर - १
संभाजी चौक - १
सुभद्रा नगर - १
गिरमे चाळ - १
येवला रोड - १
छ. शिवाजी रोड - २
यशवंत सोसायटी इंदिरापथ - १
संजय नगर - १
समता नगर - २
ब्राह्मणगाव -१
कोळपेवाडी -१
धारणगाव -३
शहाजापूर -१
टाकळी -१
चासनळी - १
लौकी -१
धामोरी - १
असे एकूण २७ रुग्णाची भर तालुक्यात पडली आहे. तर आज १४ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज पर्यंत तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या  ७३६ झाली आहे तर सध्या ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १८९. कोरोनावर उपचार घेत पूर्ण पणे बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णाची संख्या ५३३ असून आज परी
तालुक्यातील एकूण १४ रुग्णांनी कोरोनाने आपले प्राण गमावले आहे.