Breaking News

आमदार राजळे यांच्या घरावर मोर्चा;वंचित आघाडीच्या ३३ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल !

आमदार राजळे यांच्या घरावर मोर्चा;वंचित आघाडीच्या ३३ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
खरवंडी कासार : 
      जिल्हाधिकारी-यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी वंचित आघाडीचे राज्य महासचिव किसन चव्हाण यांच्यासह ३३ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे.

     लोकप्रतिनिधी या नात्याने  नोकरशाहीवर अंकुश राहिला नाही. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेधार्थ 4 ऑगस्ट मंगळवारी रोजी भाजपाच्या शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील  निवासस्थानावर वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला होता.

    याप्रकरणी पोलिसांनी वंचित आघाडीचे राज्य संघटक प्रा. किसन चव्हाण, अरविंद सोनटक्के, भोरू उर्फ रवींद्र नामदेव म्हस्के, छानराज क्षेत्रे, प्रकाश बाप्पू भोसले, प्यारेलालभाई शेख, सलीम जीलानी शेख, सुनील जाधव यांच्यासह ३३ अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहे.