Breaking News

नेवासा तालुक्यात दिवसभरात १८ रुग्णांची वाढ, एका वृद्धाचा मृत्यू तर १९ रुग्णांची कोरोणावर मात!

नेवासा तालुक्यात दिवसभरात १८ रुग्णांची वाढ, एका वृद्धाचा मृत्यू तर १९ रुग्णांची कोरोणावर मात!
                                                      
नेवासा  तालुका प्रतिनिधी :
नेवासा तालुक्यात शुक्रवार  (दि.०७) रोजी दिवसभरात १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारी  सायंकाळी तालूका आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवालात एकूण कोरोना बाधित ३२४ पैकी २२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालूक्यातील  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ८९ रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्याच्या तुलनेत नेवासा शहरात रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे.
  प्राप्त झालेल्या आहवालात खेडले काजळी येथील ६८ वर्षे वृद्धाचा मृत्यु झालेला असल्याची माहिती तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांनी दिली.
  कोरोनाबाधित झालेल्या रुग्ण  नेवासा१२, सलाबतपूर ०२ , निंभारी ०१, सोनई  ०१,खेडले काजळी ०१,उस्थळ दुमाला ०१  येथिल असून नेवासा तालूक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरी रहा,सुरक्षित रहा असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.