Breaking News

श्रीगोंदा नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका कोरोना पॉझिटिव्ह !

श्रीगोंदा नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका कोरोना पॉझिटिव्ह !
श्रीगोंदा/तालुका प्रतिनिधी :
श्रीगोंदा शहरात कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे  विद्यमान नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यासह शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात काळजी घेत असतानाच आज श्रीगोंदा शहरात माजी उपनगराध्यक्ष व त्यांची पत्नी विद्यमान नगरसेविका हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.