Breaking News

कोपरगाव राष्ट्रवादीच्या वतीने मास्क वाटप करून आ काळे चा वाढदिवस साजरा !

कोपरगाव राष्ट्रवादीच्या वतीने मास्क वाटप करून आ काळे चा वाढदिवस साजरा !
करंजी प्रतिनिधी- 
    काल ४ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ आशुतोष काळे यांचा वाढदिवस होता परंतु कोपरगाव तालुक्यावर वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता आ काळे वाढदिवस साजरा करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी कोणत्याही कार्यकर्त्यानी येऊ नये असे आव्हान केले होते.
   कोपरगांव तालुक्याचे आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यातील त्यांचा वर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यानी विविध सामाजिक उपक्रम राबवत त्याचा वाढदिवस साजरा केला, यात कोपरगांव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोपरगांव नगरपालिका आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना व कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना मास्क व कोरोनापासून बचाव व्हावा व रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 
   मागील चार महिन्यांपासून देशात नव्हे तर संपुर्ण जगात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे त्यात कोपरगांव ही वाचु शकले नाही, जेव्हापासून शहरात लाॅकडाऊन लागले आहे तेव्हा पासुन ते आज पर्यंत डाॅक्टर, पोलिस व सफाई कर्मचारी हे अपना सर्वांसाठी कोविड योद्धा म्हणून काम करत आहे व या सर्वांचे आरोग्य चांगले राहावे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी या साठी आज आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसा निमित्त सफाई कर्मचारी व पोलिसांना अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या व मास्कचे वाटप करण्यात आले आहे असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी सांगितले. 
  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,नगरपालिकेचे गटनेते विरेन बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे, महेमुद सय्यद, सुनिल शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, युवक कार्याध्यक्ष वाल्मिक लहिरे, संदिप कपिले, युवक उपाध्यक्ष बाला गंगुले, निलेश पाखरे, सागर लकारे, चंद्रशेखर म्हस्के, संतोष दळवी, संदिप देवळालीकर, ॠषिकेश खैरनार, आकाश डागा, मयुर पारधी, पप्पु गोसावी, मुन्ना पठाण, महेश उदावंत, कार्तिक सरदार आदर्श पठारे, शुभम लासुरे,बाळा देवकर व इतर कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून उपस्थित होते.