Breaking News

वनक्षेत्रपाल जाधव यांचा निरोप समारंभ संपन्न !

वनक्षेत्रपाल जाधव यांचा निरोप समारंभ संपन्न


करंजी प्रतिनिधी-
 ओम साई ग्रामिण शिक्षण संस्था कोपरगाव तर्फे कोपरगाव श्रीरामपूर व राहता विभागाचे फॉरेस्ट अधीकारी रेंजर संतोष जाधव यांची जालना येथे बदली झाल्याने  संस्थेच्या वतीने संस्थाप्रमुख परशराम साबळे यांनी जाधव यांचा छोटेखानी सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    या वेळी साबळे यांनी बोलताना सांगितले की गेल्या चार वर्षांपासून जाधव यांनी कोपरगाव वनविभागाचा पदभार स्वीकारल्यापासून विभागाअंतर्गत येणाऱ्या झाडावीना असलेल्या जंगलाचा कायापालट करत त्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करत त्याचे संगोपन करत त्या ठिकाणचा कायापालट करून नंदनवन उभे केले, संपूर्ण तालुक्यात जाधव हे एक शिस्तबद्ध कर्तव्यनिष्ठ अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती अशा या अधिकाऱ्याची बदली झाल्याने आपला तालुका अश्या अधिकाऱ्याला मुकला असे   उदगार साबळे यांनी जाधव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतांना व्यक्त केले.
       या प्रसंगी जाधव यांनी आपण कोपरगाव वनविभागा अंतर्गत येणाऱ्या वनक्षेत्रात केलेल्या कार्याचा आवर्जून उल्लेख करत मी एक अधिकारी म्हणून काम न करता एक सामान्य जनतेचा सेवक म्हणून काम करत राहील अशी ग्वाही देत संस्थेचे आभार व्यक्त केले.
   या वेळी प्रा विजय कापसे, कूळधरण भाऊसाहेब, निलेश देवकर, रेखा दिवे तसेच वनविभागाचे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.