Breaking News

दिव्यांग बांधवांना रेशन पुरवठा करून उपासमार थांबवा - मकुंदमामा काळे

दिव्यांग बांधवांना रेशन पुरवठा करून उपासमार थांबवा - मकुंदमामा काळे
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
       सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव असल्याने दळणवळण ठप्प झाल्याने दैनंदिन व्यवहार बंद आहे. प्रत्येकापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे दिव्यांग बांधवांनाही या संकटाला सामोरे जावे लागत आहे. शारीरीक व्यंगावर मात करून उदरनिर्वाहासाठी अनेक दिव्यांग बांधव काम करीत होते, परंतु कोरोनाच्या परिस्थीतीत त्यांनाही घराबाहेर पडणे शक्य होत नाही, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आसल्याने तालुक्यातील दिव्यांग बांधवाना अन्तोदय योजनेअंतर्गत प्राधान्य कुटूंब पध्दतीने रेशनचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या दिव्यांग सेलच्या वतीने करण्यात आली.
दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष  मुकुंदमामा काळे, शहराध्यक्ष मुक्तार पठाण, कार्याध्यक्ष स्वप्निल कडू, संजय इजगे, जयवंत मरसाळे यांच्या शिष्टमंडळाने कोपरगाव तहसिल कार्यालयातील  नायब तहसिलदार योगेश्वर कोतवाल यांना निवेदन दिले.
        राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंतोत्यय अन्न योजनेच्या कुटूंबांना दरमहा ३५ किलो अन्नधान्य ३ रूपये दराने तांदूळ व 2 रूपये दराने गहू वितरीत करण्यात यावे. म्हणून शासन निर्णय १७/७/२०१३ च्या शासन निर्णयान्वये व दिनांक १४/११/२०१३ च्या शासन शुध्दीपत्रकान्वये सर्व अंपगांना अंत्योदय अन्न योजनेच्या अंतर्गत रेशन देणेबाबत सांगितले आहे.
सध्या तालुक्यातील दिव्यांग बांधव लाॅकडाउन पुर्वी करत असलेली छोटेमोठे व्यवसाय, तसेच रोजंदारीवरील कामे लाॅकडाउन मुळे बंद असल्याने त्यांच्यापुढे उपासमारीचा प्रश्न उभा राहिला आहे. सध्याची लाॅकडाउनची परिस्थीती आणि शारीरीक अपंगामुळे घराबाहेर पडता येत नसल्याने शासनाने या दिव्यांग बांधवांना रेशन दयावे अशी मागणी  भाजपा दिव्यांग सेलच्य शिष्टमंडळाने केली आहे.