Breaking News

कोपरगाव तहसिल कार्यालयातील अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करा - किशोर रोहमारे

कोपरगाव तहसिल कार्यालयातील अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करा - किशोर रोहमारे

कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
     कोपरगाव तहसील कार्यालयात   रेकाॅर्ड रुम मध्ये  तालुक्यातील शहरी भागातील व ग्रामीण भागातील लोकांच्या जमीन व स्थावर मालमत्ता यांचे जुने कागदपत्रे असतात  मात्र अनेक लोकांना कायदेविषयक कामासाठी जमीनीच्या फेरफार जुने उतारे  जुने दस्तऐवज लागत असतात मात्र अनेकदा अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर कायदेशीर फि भरण्यासाठी तयार असताना देखील या विभागात मानधनावर काम करत असलेले काही   कागदपत्रे देण्यासाठी टाळाटाळ करून वेठीस धरत अ‌सल्याचे दिसून येत असल्याने या लोकांकडे कोपरगाव तहसीलदार यांचे लक्ष नसल्याने वेठीस धरत असलेल्या लोकांवर कठोर कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार केली असल्याची माहीती पोहैगाव येथील शेतकरी किशोर माधव रोहमारे यांनी   प्रसिध्दीस दिलेल्या पत्रका व्दारे दिली आहे
      शासनाने जुने दस्तऐवज लोकांना मिळाले पाहिजे ते कमी दिवसांत मिळावे यासाठी लाखो रुपये खर्च करून जुने दस्तऐवज खराब होणार नाही यासाठी मोठे अभियान राबविण्यात आले त्याचा परिणाम चांगले येतील असा हेतु होता मात्र पैश्याला चटावलेले हे मानधनावर काम करत असलेले कामगार यांचा मोठा जनसंपर्क व वशिला  तयार झाल्याने गोरगरीब सामान्य माणसाला त्याला आवश्यक कायदेशीर कागदपत्रे देताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायद्यासाठी अडवणूक करून जो पैसे देणार नाही अशा सामान्य माणसाला तुमचे कागदपत्रे सापडत नाही   माझ्यावर दडपण आणु नका नाहीतर कागदपत्रे सापडत नाही असे लेखी पत्र देऊन टाकतो असे सांगत असल्याने मोठ्या प्रमाणावर अनेकांना कोपरगाव तालुक्यात मनस्ताप  होत असल्याने या गंभीर प्रश्नात आ आशुतोष काळे यांनी लक्ष घालावे असा सुर पुढे आला आहे  कागदपत्रे हि राष्ट्रीय संपत्ती असताना  बघतो पहातो थांबा सापडत नाही असे सांगुन वेठीस धरत असलेल्या लोकांवर कठोर कारवाई झाली नाही तर आपण वेळप्रसंगी जनहिताच्या भुमिकेतुन वेळप्रसंगी कोपरगाव तहसीलदार यांच्या निष्यक्रियतेच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याचे शासकीय अधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले असुन या प्रश्नात न्याय मिळाला नाहीतर  आपण थेट. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटणार असल्याचे किशोर रोहमारे यांनी सांगितले आहे.