Breaking News

आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड मध्ये मत्स्य शेती समृद्धी अभियान !

आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड मध्ये मत्स्य शेती समृद्धी अभियान


जामखेड प्रतिनिधी
 कर्जत जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फौंडेशन, ADT, बारामती, AOC, अहमदनगर आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने तीन दिवसीय वेबिनार नूकतेच घेण्यात आले. आज दि २७ रोजी  मंत्रालयात आमदारांच्या झालेल्या बैठकीनुसार येत्या 30 ऑगस्ट रोजी केंद्र शासनासाठी सदर योजना राबविण्यासाठी पहिली बैठक होणार असून त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव जर कोणाचे असतील तर ते सादर करावेत जेणेकरून मंजुरीसाठी केंद्र शासनास पाठविण्यात येतील.  सर्वांना आवाहन करण्यात येत आहे येत आहे. इच्छुक असणार्‍यांनी बायॉफ्लोक पद्धतीने मासे पालन व्यवसाय करण्यासाठी खाली दिलेल्या कागदपत्र घेऊन येत्या दोन दिवसात आमदार रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयात यावे.
सर्वांना परत एकदा सुचित करण्यात येते की ज्याप्रमाणे आम्ही आपल्याला योजना सांगितली होती त्या अनुषंगाने लाभार्थी हिस्सा दहा टक्के बँक हिस्सा तीस टक्के व प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 60 टक्के अनुदान अशी आर्थिक तरतूद असेल तरी पात्र व्यक्तींनी आपली कागदपत्रे घेऊन त्वरित 
श्री. ओंकार ढोबळे व टीम यांना संपर्क साधावा फोन नंबर: 8669949002
प्रकल्प करण्यासाठी लागणारे कागदपत्र
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुकची झेरॉक्स
दोन पासपोर्ट साईज फोटो
शंभर रुपयाचे तीन स्टॅम्प पेपर
सातबारा उतारा
रेशन कार्ड