Breaking News

उपसा जलसिंचन योजनेतील थकित शेतकऱ्यांचे व्याज माफ करण्याची नेवासा तालूका किसान सेभेची मागणी - भारत आरगडे !

उपसा जलसिंचन योजनेतील थकित शेतकऱ्यांचे व्याज माफ करण्याची नेवासा तालूका किसान सेभेची मागणी - भारत आरगडे !


नेवासा तालुका प्रतिनिधी :
     आजपर्यंत कोणत्याही कर्जमाफीत न बसलेल्या उपसा जलसिंचन योजनेतील थकीत शेतकऱ्यांचे व्याज माफ करण्याची मागणी नेवासा तालूका किसान सभेचे तालूकाध्यक्ष कॉ.भारत आरगडे यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारी संचालकांकडे निवेदनाव्दारे केली आहे.                                                                     
      या निवेदनात कॉ.आरगडे यांनी म्हटले आहे की,आज पर्यंत केंद्र तसेच राज्य सरकारने अनेक वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. परंतु काही शेतकरी एकाही कर्जमाफी मध्ये बसलेले नाही विशेषत: उपसा जलसिंचन योजनेसाठी विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडून मध्यम मुदत कर्ज थकीत शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी एकरी चार ते पाच हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांचे आज व्याजासह मुद्दलाच्या चार ते पाच पट रक्कम झाली आहे.
       कायद्यानुसार कर्जाच्या मुद्दलाच्या दुप्पट व्याज घेता येत नाही. परंतु आपली बँक मात्र सर्व व्याज वसूल करत आहे. हे बेकायदेशीर आहे राष्ट्रीयकृत बँका थकीत कर्जदारांचे फक्त मुद्दल वसूल करून (ओ.टि.एस) करत आहेत आणि आपली शेतकऱ्यांची बँक असूनही चौपट,पाचपट रक्कम शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करत आहे त्यामुळे या निवेदनाव्दारे आपणास विनंती करण्यात येते की बँकेने धोरणात्मक निर्णय घेऊन थकीत कर्जदारांचे सर्व व्याज माफ करावे अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशाराही यावेळी महाराष्ट्र किसान सभा नेवासा तालूक्याच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी संचालकांना देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री,राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत. या निवेदनावर तालूकाध्यक्ष कॉ. भारत आरगडे,कॉ. आप्पासाहेब वाबळे,कॉ. गोरक्षनाथ आरगडे. कॉ. बंडू आरगडे,कॉ. बाबासाहेब जावळे आदींच्या सह्या आहेत.