Breaking News

अकोले तालुक्यात कोरोना ने घेतला ११ वा बळी..!

अकोले तालुक्यात कोरोनाने घेतला ११ वा बळी..!

अकोले प्रतिनिधी :
     अकोले शहरातील उपनगर असणारे धुमाळवाडी येथील ६९ वर्षीय व्यक्तीचा  कोरोनाने बळी घेतला आहे. 
   धुमाळवाडी येथील  या व्यक्तीचा  २१ ऑगस्ट रोजी खाजगी  प्रयोगशाळेत  कोरोना पॅाझिटीव्ह अहवाल आला होता  ६९ वर्षीय व्यक्तीचा खाजगी रूग्णालयात उपचार सुरु असताना आज दुपारी मृत्यु झाला आहे .यामुळे कोरोना ने बळी गेलेल्या रुग्णा ची संख्या ११ झाली आहे.
   काळ गुरुवारी  सकाळी 13 व्यक्ती बाधित आढळले नंतर सायंकाळी राञी उशिरा खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात तालुक्यातील चार व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला  यात तालुक्यातील कोतुळ येथील ६७ वर्षीय पुरुष,५९ वर्षीय महीला,सावरगाव पाट येथील ४१ वर्षीय पुरुष,बदगी बेलापुर येथील ६४ वर्षीय पुरुष अश्या चार व्यक्ती पॅाझिटीव्ह आढळल्या तर 
 आज शुक्रवारी राजुर ग्रामीण रूग्णालयात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन मध्ये पाडाळणे येथील २५ वर्षीय पुरुष,३३वर्षीय पुरुष,
 ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्टमध्ये ब्राम्हणवाडा येथील ५६ वर्षीय पुरुष,६४ वर्षीय पुरुष अशी चार व्यक्ती पॅाझिटीव्ह आली आहे.
    आज दिवसभरात खाजगी व ॲन्टीजन टेस्ट मिळून  एकुण ०८ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.तर खानापुर कोविड सेंटर येथे आज ३५ व्यक्तीचे स्वॅब घेऊन अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असुन  त्यांचा अहवाल येणे  बाकी  आहे.
  तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ५११ झाली आहे त्यापैकी ३८२ रुग्णां वर  उपचार करुन बरे झालेली आहेत तर ११८ रुग्णां वर उपचार सुरु आहे.
--------------