Breaking News

आ. प्रशांत बंब यांची व्यथा !

आ. प्रशांत बंब यांची व्यथा !


     सार्वजनिक बांधकाम खात्यात कित्येक अधिकारी ,कर्मचारी सचोटीने इमानदारीने तसेच कुणाच्याही दबावाला बळी न पडता चांगली सेवा देत आहे.राज्याच्या विकासात या मंडळींनी सकारात्मक वाटा उचलला आहे.या घटकांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिष्ठा उजळली आहे.माञ या प्रतिष्ठेला डंख मारण्याचा उद्योग काही विक्षीप्त राक्षसी वृत्तीची माणसं बांधकाम विभागात टोळी निर्माण करून खात्याची रयाच बदनाम करून टाकतात.अर्थात यातील उत्तरार्ध आ.प्रशांत बंब यांच मत आहे.त्यांनी गेल्या पाच सहा वर्षात अशा अनेक प्रवृत्तींचा पर्दाफाश केलाय.त्यापैकी अनेकांच्या कुंडल्या लोकमंथननेही चव्हाट्यावर आणल्यात,सध्या प्रशांत बंब यांच्या निशाण्यावर नुकतेच सेवानिवृत्त झालेले बांधकाम सचिव चंद्रकांत प्रभाकर तथा माध्यम प्रवर्गाचे लाडके सी.पी.जोशी असल्याचे त्यांचा पञव्यवहार सांगतोय.lead

गंगापूरचे भाजपचे आ.प्रशांत बंब हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या कार्यशैलीवर पुन्हा खप्पा झाल्याचे दिसते.विशेषतः बांधकाम विभागाचे सचिव म्हणून ३१ जुलै रोजी निवृत्त झालेले सी.पी.जोशी यांच्याविरूध्द जवळपास वर्ष प्रशांत बंब यांनी पुराव्यासह शासन दरबारी पञव्यवहार केला आहे.रस्ते बांधकाम विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असतांना चद्रकांत प्रभाकर तथा सी.पी.जोशी यांनी नियमबाह्य रितीने शासनाची दिशाभूल करून शासन निर्णय निर्गमीत केल्याने महाराष्ट्राचे किमान ५० हजार कोटींचे नुकसान झाल्याचा खळबळजनक आरोप आ.प्रशांत बंब करीत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून प्रशांत बंब हा मुद्दा घेऊन लढत आहेत.तीच तक्रार त्यांनी आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.हजारो कोटींच्या या भ्रष्टाचाराबाबत  अनेक तक्रारी करूनही एकाही तक्रारीची दखल शासन प्रशासन पातळीवर घेतली गेली नाही किंबहूना या तक्रारी अर्थहिन आहेत असेही प्रशासनाने कळवले नाही अशी आ.बंब यांची खंत आहे.
आ.बंब यांनी केलेल्या दाव्यानुसार सी.पी.जोशी.यांनी निवृत्तीच्या दिवशीही शासनाच्या डोळ्यात धुळफेक केली आहे.घरी जाताजाता अनेक शासन निर्णय बेकायदेशीरपणे काढून भ्रष्टाचाराचा मार्ग प्रशस्त केला.अगदी शेवटच्या दिवशी निघालेला  शासन निर्णय हा खरा बंब यांच्या नजरेत कळीचा मुद्दा आहे.
वास्तविक  सार्वजनिक बांधकाम खात्यात कित्येक अधिकारी ,कर्मचारी सचोटीने इमानदारीने तसेच कुणाच्याही दबावाला बळी न पडता चांगली सेवा देत आहेत.राज्याच्या विकासात या मंडळींनी सकारात्मक वाटा उचलला आहे.या घटकांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिष्ठा उजळली आहे.माञ या प्रतिष्ठेला डंख मारण्याचा उद्योग काही विक्षीप्त राक्षसी वृत्तीची माणसं बांधकाम विभागात टोळी निर्माण करून खात्याची रयाच बदनाम करून टाकतात.अर्थात यातील उत्तरार्ध आ.प्रशांत बंब यांच मत आहे.त्यांनी गेल्या पाच सहा वर्षात अशा अनेक प्रवृत्तींचा पर्दाफाश केलाय.त्यापैकी अनेकांच्या कुंडल्या लोकमंथननेही चव्हाट्यावर आणल्यात,सध्या प्रशांत बंब यांच्या निशाण्यावर नुकतेच सेवानिवृत्त झालेले बांधकाम सचिव चंद्रकांत प्रभाकर तथा माध्यम प्रवर्गाचे लाडके सी.पी.जोशी असल्याचे त्यांचा पञव्यवहार सांगतोय.
आ.प्रशांत बंब हे गेली पाच वर्ष सत्ताधारी पक्षाचे आमदार होते.त्या काळातही त्यांनी हा मुद्दा धसास लावण्याचा प्रयत्न केला,शासन प्रशासन स्वपक्षाचे असतानाही त्यांनी केलेली तक्रार दखलपाञ ठरली नाही.आता तर विरोधी पक्षाचे सरकार आहे.आणि ज्या शासन निर्णयावर बंब यांचा आक्षेप आहे,तसे अनेक शासन निर्णय तत्कालीन मुख्यमंञी फडणवीस,तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंञी चंद्रकांत दादा पाटील यांनीही काढले आहेत.विद्यमान सरकार त्याच पावलावर पाऊल ठेवून चालत असेल तर आ.बंब यांना आताच  चिंता का वाटावी?
-- डॉ. अशोक सोनवणे (मुख्यसंपादक दैनिक लोकमंथन )