Breaking News

वृक्ष रक्षाबंधन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे केडगाव जागरूक नागरिक मंचातर्फे आयोजन !

वृक्ष रक्षाबंधन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे केडगाव जागरूक नागरिक मंचातर्फे आयोजन !
केडगाव/प्रतिनिधी :
      'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ' या तुकोबांच्या अभंगाप्रमाणे कृती करत केडगाव जागरूक नागरिक मंच या सेवाभावी सामाजिक  संस्थेतर्फे ग्रीन केडगाव ही मोहीम रक्षाबंधनाच्या निमित्ताने हाती घेतली. केडगाव भागात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट संस्थेच आहे गावातील अनेक भागात पर्यावरणाला अधिक लाभदायक असे वृक्ष ,वड , पिंपळ ,सप्तपर्णी , बदाम , कडूनिंब यांचे रोपण करण्यात आले झाडांना राख्या बांधून त्यांचं रक्षण व संगोपन करण्याची शपथ नागरिकांनी घेतली.
      पर्यावरणाचा समतोल वृक्षारोपणातून संभव होईल शुद्ध हवा मुबलक पाऊस या गोष्टी आरोग्यदायी समाजजीवनाला उपयोगी असतात असे मंचाचे अध्यक्ष श्री विशाल पाचारणे यांनी व्यक्त केले. केडगाव जागरूक नागरिक मंचाने गावातील नागरिकांना वृक्षारोपणासाठी केलेल्या आवाहनाला आव्हानाला नागरिकांनी भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .शाळा ,अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र ,मंदिर परिसर , लिंक रोड येथे नागरिक सकाळी फिरण्यास जातात येथील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नंदाराम कर्डिले , श्री.जगदाळे,  बबन पांबळे, शिवमूर्ती कलशेट्टी, श्री.मन्यार संस्थेचे पदाधिकारी प्रवीण पाटसकर, मंदार सटाणकर, सुहास साळवे, गणेश पाडळे , अंबिका कंकाळ, पुनम तानवडे, अनिता डेंगळे आदी उपस्थित होते.