Breaking News

नेवासा तालूक्यात कोरोनाच्या साडेसातीचा 'कहर' १३ रुग्णांची वाढ, ३९ कोरोनामुक्त !

नेवासा तालूक्यात कोरोनाच्या साडेसातीचा 'कहर' १३ रुग्णांची वाढ, ३९ कोरोनामुक्त !


नेवासा तालुका प्रतिनिधी :
      नेवासा तालूक्यात कोरोनाचा कहर कमी - अघिक प्रमाणात सुरुच असून तालूका आरोग्य विभागाने गुरुवार (दि.२७) रोजी दिलेल्या माहीतीमध्ये नव्या १३ रुग्णांची वाढ झालेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ३९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे तालूका आरोग्य विभागाच्या सुञांनी दिलेल्या माहीतीमध्ये स्पष्ट केले आहे.
        नव्या १३ रुग्णांमध्ये शनिशिंगणापूर येथील ०७ तर नेवासा खुर्द ०२, गेवराई ०१, खडका ०१, भानसहिवरे ०१, तर सोनईच्या एका रुग्णाचा समावेश झाला आहे.कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक कमी - अधिक प्रमाणात तालूक्यात वाढत जात असल्याने नेवासकरांचा जीव टांगणीला लागला आहे.रुग्ण वाढले तर नियम कडक होत असल्याने व्यापाऱ्यांवर संक्रांत कोसळली जात आहे.    
     त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा अर्थिक फटका बसत आहे.लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांसह कामगारांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहीला आहे. नेवासा तालूक्यात कोरोनाच्या साडेसातीमुळे जनता हैराण झाली आहे.