Breaking News

नाटेगाव येथील बेवारस शौचालय लोकार्पण सोहळा व उदघाटन संपन्न !

नाटेगाव येथील बेवारस शौचालय लोकार्पण सोहळा व उदघाटन संपन्न
( ग्रामस्थांची बेवारस शौचालयां विरोधात गांधीगीरी )
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घर तिथे शौचालय योजनेतून कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील  ग्रामपंचायतीच्या वतीने सरकारी तिजोरीची स्वच्छता करण्याचे काम सुरू असून गावातील मिळकत धारकांपेक्षा अनेक कुटुंबात एका पेक्षा जास्त शौचालय दिले असून या शौचालय घोटाळ्याची वरिष्ठ स्तरीय चौकशी करावी म्हणून ग्रामस्थांनी मागणी केली असून सदर तक्रार अर्जाची प्रत  पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना महितीस्तव दिली असता गटविकास अधिकारी यांनी वरिष्ठांचे कोणतेही आदेश नसताना आपल्या अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या दृष्टीने गट  विस्तार अधिकारी यांची चौकशी समिती नेमून ज्यांच्या वर घोटाळ्याचा संशय घेतला त्यांनाच सोबत घेऊन चौकशी सुरू केली.
     सदर चौकशी दरम्यान माजी सरपंच संगीता मोरे यांचे पती ज्ञानेश्वर मोरे व ग्रामसेवक अवचिते यांचे पती यांनी चौकशीला सहकार्य करण्या ऐवजी जे लाभार्थी गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून त्यांचे घर मिळकती न राहता गावापासून दोन ते तीन किलो मीटर शेतात राहतात अशा ठिकाणी घर मिळकत अस्तित्वात नसताना रातोरात शौचालय उभारणी केली.
असा प्रकारे दोषी व्यक्तींना सोबत घेऊन होत असलेल्या चौकशी वर शंका घेऊन तक्रार दार यांनी सदर चौकशी थांबवावी अशी मागणी केली.
दरम्यान गावात राहत नसलेल्या लाभार्थी च्या नावावर बेवारस शौचालय बांधकाम केल्याचा प्रताप माजी सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्या पतीने संगनमत करून केला. 
     असा बेवारस शौचालयाचा लोकार्पण सोहळा व उदघाटन गांधीगिरी पद्धतीने आज श्रावणी सोमवारी तक्रारदार व ग्रामस्थ यांनी सत्यनारायण करून केला असून या कार्यक्रमास विद्यमान व माजी सरपंच तसेच ग्रामसेविका यांना निमंत्रित केले होते तसी पञीकाच आठ दिवसापासुन सोशल मिडीयावरुन प्रसिध्द केली होती  मात्र त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली मात्र शौचालय घोटाळ्याचे सत्य बाहेर आणण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड.नितीन पोळ यांनी सांगितले कार्यक्रमास माजी सरपंच जयराम धोंडिबा मोरे डॉ गोरख मोरे, गणेश मोरे, विकास मोरे, रतन माळी मारुती मोरे आदी हजर होते.