Breaking News

चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत?

चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत?

- चांद्रयान
- फोटोंवरुन समोर आली नवीन माहिती
- भारतीय वैज्ञानिकांच्या आशा पल्लवीत
- चेन्नईच्या इंजिनिअरचा नासा, इस्त्रोला ई-मेल
नवी दिल्ली/ प्रतिनिधी
गेल्या वर्षी ‘नासा’च्या फोटोंचा वापर करुन विक्रमचा ढिगारा (डेब्रिस) ओळखणारे चेन्नईचे इंजिनिअर शनमुग सुब्रमण्यन यांनी इस्त्रोला एक ई-मेल पाठवून प्रज्ञान रोव्हर काही मीटर पुढे सरकल्याचा दावा केला आहे. त्यामुळे प्रज्ञान रोव्हर सुस्थितीत असल्याचे स्पष्ट होत असून, भारतीय अवकाश संस्था इस्त्रोला पाठवलेल्या ई-मेलमध्ये शनमुग सुब्रमण्यन यांनी ‘नासा’ने मे महिन्यात जारी केलेल्या फोटोंवरुन प्रज्ञान काही मीटर पुढे आल्याचे संकेत मिळाल्याचा दावा करत सुखद धक्का दिला.
दरम्यान, यावर इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांचीही प्रतिक्रिया आली असून, त्यांनी, आम्हाला याबाबत अजून नासाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण, ज्या व्यक्तीने विक्रमचा ढिगारा ओळखला होता, त्याने आम्हाला याबाबत ई-मेल केला आहे. आमचे तज्ज्ञ त्यावर अभ्यास करत आहेत, पण आताच याबाबत काहीही सांगता येणार नाही, अशी माहिती दिली आहे. तर, ४ जानेवारीच्या फोटोंवरुन (मे महिन्यात जारी झालेल्या) प्रज्ञान लँडर अजून शाबूत असून काही मीटर पुढे सरकल्याचे दिसते. रोव्हर पुढे कसा सरकला असेल हे समजणे गरजेचे आहे, इस्त्रो याबाबत नेमकी माहिती देईल अशी अपेक्षा आहे, असे शनमुगा म्हणाले. तसेच, इस्त्रोकडून (ग्राउंड टीमकडून) पाठवण्यात आलेल्या काही ‘ब्लाइंड’ कमांड्स प्रज्ञानने फॉलो केल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
--------------------