Breaking News

पारनेर तालुक्यात दिवसभरात १८ व्यक्ती कोरोना बाधित, वडझिरे येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा !

पारनेर तालुक्यात दिवसभरात १८ व्यक्ती कोरोना बाधित, वडझिरे येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना ची बाधा !
पारनेर शहरात पुन्हा नव्याने तीन व्यक्ती कोरोना बाधित 
पारनेर प्रतिनिधी - 
     पारनेर तालुक्यात कोरोना धोका वाढत आहे आज आलेल्या अहवालांमध्ये पारनेर तालुक्यातील एकूण १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे
यामध्ये वडझिरे ४, निघोज २, पारनेर शहरातील ३, नांदूर पठार १, कर्जुले हर्या १, तिखोल १, वडगाव आमली १, जमगाव १, गांजीभोयरे १, डिकसळ २, नारायणगव्हाण १, असे १८ व्यक्ती दि ५ राजी ८ वाजे पर्यत आलेल्या कोरोना चाचणी अहवालात कोरोना बाधित आढळले आहेत.
   तर रुई छत्रपती येथील १ अहवाल व पारनेर किराणा दुकानदाराच्या कुटुंबातील १ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे.
  पारनेर शहरातील वरखेड मळा येथील ४२ वर्षीय तरुण कोरोना बाधित आढळला आहे  तो पारनेर शहरातील सिद्धेश्वर डेअरीमध्ये दूध घालत होता तेथील कर्मचारी व संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्वरित आपली कोरोना चाचणी तपासणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे.  
   पारनेर तालुक्यातील ज्या भागात आज कोरोना बाधित व्यक्ती सापडले आहेत तेथील १०० मीटर परिसर १४ दिवसांसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.