Breaking News

रस्त्यात वृक्षारोपन करुन बांधकाम खात्याला दिला घरचा आहेर ! इंदिरा कॉंग्रेस व घटनापती युवा प्रतिष्ठाणचे आंदोलन !

रस्त्यात वृक्षारोपन करुन बांधकाम खात्याला दिला घरचा आहेर ! इंदिरा कॉंग्रेस व घटनापती युवा प्रतिष्ठाणचे आंदोलन !
नेवासा तालुका प्रतिनिधी :
नेवासा ते नेवासा फाटा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरुन चालतांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत अाहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले असतांनाही सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेत असल्याच्या निषेधार्थ गुरुवार (दि.२०) रोजी दुपारी १२ वाजता रस्त्यात वृक्षारोपन करुन इंदिरा कॉंग्रेस व घटनापती युवा प्रतिष्ठाणने नेवासा फाटा येथे आंदोलन करुन सार्वजनिक बांधकाम खात्याला घरेचा आहेर दिला.
   या आंदोलनाप्रसंगी बोलतांना इंदिरा कॉंग्रेस पक्षाचे (एस.सी) विभाग जिल्हा उपाध्यक्ष प्रविण साळवे म्हणाले की, नेवासा - नेवासा फाटा रस्त्याची मोठी बिकट अवस्था झालेली आहे. रस्त्यात प्रचंड प्रमाणात खड्डे असल्यामुळे वाहनधारक खड्ड्यांना हुलकानी देण्याच्या नादात अनेक छोटे - मोठे अपघात होत आसतांना जर सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करणार असेल तर पक्षाच्यावतीने आंदोलन अधिक तिव्र करुन बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशाराही यावेळी साळवे यांनी दिला.
   तर यावेळी बोलतांना घटनापती युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रवि भालेराव म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या समस्याकडे दुर्लक्ष करत असून रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास बांधकाम विभागाला जबाबदार धरुन शासनाने या बांधकाम खात्यावरच अपघाताचे गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी भालेराव यांनी केली.
  या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालूकाध्यक्ष सुशिल धायजे,मेडिकल असोशियशनचे तालूका अध्यक्ष रमेश सांवत,अनिल नेमाने,निखील चंदानी,आल्ताब कुरेशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.