Breaking News

नेवाशात मंगळवारी चार रुग्ण कोरोना बाधीत तर १८ रुग्णांची कोरोनावर मात, तर १० जणांचा मृत्यु !

नेवाशात मंगळवारी चार रुग्ण कोरोना बाधीत तर १८ रुग्णांची कोरोनावर मात, तर १० जणांचा मृत्यु !
नेवासा तालुका प्रतिनिधी :
    नेवासा तालूक्यात दोन दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग कमी होत चालल्याने ही बाब नेवासकरांना दिलासादायक ठरलेली आहे.मंगळवार (दि.१८) रोजी तालूका आरोग्य विभागाकडे प्राप्त झालेल्या अहवालात मंगळवारी नव्या ४ रुग्णांची वाढ झालेली आसून १८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे दिलासादायक बाब समोर आलेली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत १० जणांचा मृत्यु झाल्याचे ही या अहवालातून समोर आलेले आहे.
  दोन दिवसांच्या कालखंडानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून आलेले आहे.तालूका आरोग्य विभाग कोरोनावर मात करण्यासाठी अहोराञ मेहनत घेत आहे.दोन दिवसाच्या प्रतिक्षेनंतर बाधीतांचा अकडा कमी झाल्याने नेवासकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी ४ रुग्णबाधीत झालेले असून २ मक्तापूर व २ नेवासा खुर्द येथील असल्याची माहीती यावेळी सुञांनी दिली.
  नेवासा तालूक्यात एकूण कोरोनाबाधीत रुग्ण ५०६ झालेले आहेत तर ३७१ रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे.१२५ रुग्णांवर उपचार सुरु असून  १० रुग्णांचा मृत्यु झाल्याचे आरोग्य विभागाच्या सुञांकडून सांगण्यात आले आहे.बाधीत रुग्ण संख्येचा अकडा रोडावल्याने नेवासकरांतून समाधान व्यक्त केले जात आहे