पारनेर तालुक्यात आज ५ अहवाल पॉझिटिव्ह ३६ अहवाल निगेटिव्ह, शहरातील एका व्यक्तीचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू ! पारनेर प्रतिनिधी- पारनेर तालु...
पारनेर तालुक्यात आज ५ अहवाल पॉझिटिव्ह ३६ अहवाल निगेटिव्ह, शहरातील एका व्यक्तीचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू !
पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालामध्ये ५ व्यक्तींना कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी दिली आहे तर पारनेर शहरातील एका ५३ वर्षीय किराणा व्यावसायिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून नगर येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते तर तालुक्यातील ३६ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
तालुक्यातील पॉझिटिव्ह अहवालामध्ये सुपा १ गुणोरे २ निघोज १ जवळा १ यांचा समावेश आहे.
तर निगेटिव्ह अहवालामध्ये पारनेर ८ म्हसणे १ सारोळा अडवाई ५ कान्हूर पठार ५ गुणवरे ४ विरोली १ राळेगण थेरपाळ १ पुणेवाडी १ निघोज ६ जवळा ३ पाडळी १ यांचा निगेटिव्ह अहवालात समावेश आहे
पारनेर तालुक्यात जवळा निघोज या परिसरामध्ये कोरोना चा संसर्ग वाढत आहे तसेच पारनेर शहरांमध्ये मृत्यू वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे काल सहा कोरोना बाधित अहवालात प्राप्त झाले त्यानंतर टाकळी ढोकेश्वर हे गाव दोन दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत तसेच पारनेर तालुक्यातील ज्या गावांमध्ये कोरोना बाधित व्यक्ती अहवालात आढळल्या आहेत तेथील १०० मीटर चा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहे.