Breaking News

गौरी गणपती चे आकर्षक सजावट करून आगमन !

गौरी गणपतीचे आकर्षक सजावट करून आगमन


करंजी प्रतिनिधी -
     येवला येथील रहिवाशी प्रसिध्द सई लेडीज वेअरचे मालक विशाल काथवटे यांच्याकडे गौरी गणपतीचा सुंदर देखावा करत गौराई चे स्वागत करण्यात आले.
वाढत्या कोरोना च्या प्रादुर्भाव मुळे सर्वत्र सर्व धर्मियांचे सण उत्साह घरगुती पध्दतीने करण्यात येत.
     लहान मोठ्या पासून सर्वांच्या आवडतीचा गणपती उत्सव देखील घरगुती पध्दतीने साजरा होत असतांना गणपती गौराई चे देखील स्वागत आकर्षक घरगुती पध्दतीने वेगवेगळ्या कल्पना वापरत सजावटीत विराजमान झाल्या आहे.
      काथवटे यांच्या घरी गणपती बैलगाडीत बसवून गौरींना पेशवाई पद्धतीने नऊवारी साडी परिधान करत  जगाचा पोशिंदा शेतकरी राजा च्या भावना यातून व्यक्त खेडेगावातील संस्कृती परत नवीन पिढ्या समोर मांडण्याचा प्रयत्न यातून छानसे उदाहरण मांडण्याचा प्रयत्न केला गेला असून यात  काही स्त्रीया चूलीवर स्वयंपाक करत होत्या, तर काही विहीरीतून पीणी काढण्यात मग्न होत्या, उखळीत कांडण्यात व्यस्त होत्या, मुले विटी दांडू, सूर पारंब्या खेळण्यात मग्न होती, शेतात शेतकरी नांगरत होता.
      असे ग्रामीण भागातील चित्र उभे करत सध्या मैदानी खेळ हद्दपार होत चाली असतांना यातून आजच्या तरुण पिढी करिता चांगला संदेश दिला गेला आहे.