Breaking News

भूमिगत गटार करून मिळावी या साठी कोपरगाव नगरपालिकेला निवेदन !

भूमिगत गटार करून मिळावी या साठी कोपरगाव नगरपालिकेला निवेदन

करंजी प्रतिनिधी-
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील लक्ष्मीनगर भागातील बनकर घर ते फरताळे घर या अंतरावरील भागात भूमिगत गटार तयार करून मिळावी असे निवेदन आज ६ ऑगस्ट रोजी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना शिवसेना विभाग प्रमुख आकाश कानडे,अनिल बनसोडे,सुरेश त्रिभवन,करण देवरे तसेच लक्ष्मीनगर भागातील बनकर घर ते फरताळे घर परिसरातील रहिवाश्यांच्या वतीने दिले आहे.
   या निवेदनावर सुभाष बनकर,सुनीता पोटे,सुनील खरात,विठ्ठल त्रिभुवन, आकाश कानडे,रविंद्र बोरावके,सुनीता बोरावके,यादव,मयूर औताडे,मोतीराम वाघ,जोस्तना बनसोडे,प्रमिला बगाड, अनुसया गाडेकर,अभय नेरे, मारुती देवरे, राहुल नगरकर, रणजित फरताळे आदींच्या सह्या आहेत.
 या निवेदनात म्हंटले आहे की बनकर घर ते फरताळे वस्ती जवळून जणारी गटार ही खुली असून त्या गटारीमुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असल्याने त्या मुळे परिसरात साथीचे आजार देखील वाढू शकतात आधीच कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असतांना असे साथीचे आजार सूरु झाले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते तसेच या उगड्या गटारीमुळे परिसरात विषारी प्राण्यांची संख्या देखील वाढली असून हेच प्राणी दरवाजा खिडकी द्वारे आत येऊ पाहतात किंवा अंगणात दिसतात त्या मुळे उद्या पुढे चालुन मोठा अपघात होऊ शकतो यात शंकाच नाही. पावसाळ्यात जास्त पाऊस झाला की गटारीच्या बाहेरून पाणी वाहून ते तेथील घराच्या भिंतीत मुरत असल्याने घरांना सुद्धा धोका निर्माण झाल्याने घरांची पडझड होऊन जीवित हानी होऊ शकते त्या मुळे कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत  सरोदे यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन गटार भूमिगत करण्यासाठी प्रयत्न करावे आशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.