Breaking News

बॉलिवूडमधला मराठमोळा दिग्दर्शक हरपला

- दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन


हैदराबाद/ प्रतिनिधी

प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता निशिकांत कामत यांचे वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले. अभिनेता रितेश देशमुख याने याबाबत ट्वीट करत माहिती दिली.

निशिकांत कामत यांना गेल्या अनेक वर्षांपासून लिव्हर सिरोसिस नावाच्या आजाराने ग्रासले होते. 31 जुलै रोजी कामत यांना हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पाच वर्षापूर्वी निशिकांत कामत यांनी अजय देवगन आणि तब्बू यांच्यासोबत ’दृष्यम’, इरफान खानसोबत ’मुंबई मेरी जान’ आणि ’मदारी’, जॉन अब्राहमसोबत ’फोर्स’ आणि रॉकी हँडसम’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मराठी चित्रपटांमध्ये ’डोंबिवली फास्ट’ व्यतिरिक्त त्यांनी रितेश देशमुख आणि राधिका आपटे यांना घेऊन ’लय भारी’, ’फुगे’ या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ’सातच्या आत घरात’ हा मराठी चित्रपट लिहिण्याव्यतिरिक्त त्यांनी या चित्रपटात अभिनय देखील केला होता. हिंदी चित्रपटांमध्ये विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित ’भावेश जोशी’ आणि ’रॉकी हँडसम’ या सिनेमांतही निशिकांत कामत यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या. 2022 मध्ये रिलीज होणार्‍या ’दर-ब-दर’ या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची ते तयारी करत होते.

---------------