Breaking News

करंजी बु येथे दूध दरवाढसाठी आंदोलन !

करंजी बु येथे दूध दरवाढसाठी आंदोलन
करंजी प्रतिनिधी- 
आज महाराष्ट्र भाजपच्या वतीने शेतकरी दूध उत्पादकाच्या दूध दरवाढसाठी पुकारलेल्या आंदोलनास कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  शासनाच्या सोशल डिस्टनसिंग च्या नियमांचे पालन करून करंजी भाजप व शेतकरी दूध उत्पादकांनी शांततेत आंदोलन करत पाठींबा दिला.
   या आंदोलनात पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री नवनाथ आगवन, संजीवनी साखर कारखाना संचालक श्री भास्कर भिंगारे, सरपंच श्री छबुराव आहेर, उपसरपंच श्री रविंद्र आगवन, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री संतोष भिंगारे, तालुका शेतकरी संघाचे संचालक श्री अरुण भिंगारे,श्री देविदास भिंगारे,श्री विकास शिंदे,श्री अनिल डोखे,श्री लक्ष्मण शेळके,श्री आकाश भिंगारे,श्री राजेंद्र चरमळ, श्री केशव जोर्वेकर, श्री जोरवर बाबा, श्री सोमनाथ फापाळे आदी भाजप कार्यकर्तेसह शेतकरी दूध उत्पादक या आंदोलनात शांततेत सहभागी झाले होते.
  आज शेतकऱ्यांचा पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णहता कोलमडून गेला असतांनाच हवामान बदलामुळे वेळेवर पाऊस येत नसल्याने पिकांवर रोगराईचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येते आणि आता या कोरोनाचा महामारी च्या प्रादुर्भावाने लॉकडाउन च्या वाईट काळास सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यां वर आल्याने सामान्य जनते सोबतच शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली असतांना शेतकऱ्यांला आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दूध धंदा हा एकमेव पर्याय होता परंतु मागील काही महिन्यांपासून दुधाला प्रतिलीटर १५ ते १८ रुपये भाव मिळत असल्याने आता शेतकऱ्याला आपले कुटूंब चालवणे देखील अवघड होऊन बसले आहे. 
    त्यामुळे या सरकारने दुधाला प्रतिलीटर ३० रुपये भाव देत प्रतिलिटर १० रुपये अनुदान देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे तसेच दुधा पासून तयार केलेल्या भुकटीस प्रतिकिलो ५० रूपये अनुदान दिले तर दूध धंद्यास चालना मिळून दूध व्यवसाय वाढण्यास मदत होऊ शकते. जेणेकरून कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे भरकटलेली असल्याने ती पुनर्जीवित होण्यास वाव मिळू शकतो. 
    अशा प्रमुख मागण्या करत करंजी भाजप व शेतकरी दूध उत्पादकांनी शांततेत आंदोलन करत शासनाने आमच्या मागण्याचा गांभीर्याने विचार करून शेतकरी हिताचे निर्णय घेत शेतकऱ्याला आर्थिक संकटातून बाहेर काढत न्याय मिळवून द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या.