Breaking News

म्हसणे तलाठी कार्यालयाच्या गलथानपणा चा माजी सैनिकाला मनस्ताप

म्हसणे तलाठी कार्यालयाच्या गलथानपणा चा माजी सैनिकाला मनस्ताप
--–--------
अनेक दिवस उलटूनही तलाठी कार्यालयातील काम प्रलंबितच
------------
मात्र त्यानंतर काही अर्ज मंजूर होऊन काम पूर्णही झाले मग तेथे चिरीमिरी प्रकार होतो का 
------------

पारनेर प्रतिनिधी - 
      अनेक वर्षापूर्वी कुळाच्या जमिनीचे मालकी हस्तांतर झाले ते हस्तांतरित होत असताना शासनाचे कर्ज असल्याने इतर अधिकारांमध्ये त्यांची नावे घालण्यात आली मात्र पुढे शासनाने हे कर्ज माफ केले मात्र इतर अधिकारातील नावे कमी न केल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनी खरेदी विक्री करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते वडनेर हवेली ता पारनेर येथील एका माजी सैनिकाच्या सातबारावरील इतर अधिकारातील नावे कमी करण्याबाबत म्हसणे ता.पारनेर तलाठी कार्यालयात अर्ज केला मात्र अनेक हेलपाटे मारूनही तलाठ्यांनी इतर अधिकारातील नावे कमी केली नाहीत. यामुळे  तलाठी कार्यालयाच्या गलथान कारभाराचा मनस्ताप माजी सैनिकाला सहन करावा लागत आहे.
वडनेर हवेली येथील माजी सैनिक बाबाजी बढे यांनी सातबारा उताऱ्यावर इतर अधिकार्‍याचे नाव कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयात अनेक दिवसापासून अर्ज केला आहे मात्र अर्जाला अद्यापही तलाठ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही त्या कामी त्यांना अनेक वेळा तलाठी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबचा अर्ज बाबाजी बढे यांनी म्हसणे येथील तलाठी कार्यालयात २६ ऑगस्ट २०१९ ला केला होता पण अजुन ही त्यावर कोणतीही कारवाई केली नाही.  वडनेर हवेली गावात कुळाने ज्या जमीनी विशिष्ठ सरकारी रक्कम (बडींग कर्ज) घेऊन हस्तांतरित झाल्या.व एक नियमित हप्ता ठरला व बडिंग कर्ज फिटे पर्यंत भालचंद्र विनायक नाईक हे नाव इतर हक्कात दाखल झाले त्या नंतर काहींनी पहिला हप्ता भरला पुढे  महसूल फेर क्रमांक (२३) प्रमाने व त्यानंतर शासनाने बडिंग कर्ज माफ केले. शासन निर्णय फेर नंबर (२३८) प्रमाने कर्ज माफ झाल्यावर इतर अधिकारातील नावे काढने हे तत्कालीन तेव्हाच्या तलाठ्याची जबाबदारी होती पण त्यावेळी ते होऊ शकले नाही 
वडनेर हवेली गावातील अनेक उताऱ्यावर अशा प्रकारची नावे आहेत मात्र सध्या ज्याला याबाबत काही अडचणी येतात तो शेतकरी तलाठी कार्यालय मध्ये नाव कमी करण्याबाबत अर्ज करतो मात्र तेथे या अर्जाला महत्त्व दिले जात नाही व पुढे कोणतीही कारवाई करीत नसल्याने शेतकऱ्यांना हा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

   अनेक दिवसापासून या बाबत अर्ज केला आहे त्याचा पाठपुरावा केला पण मधल्या काळामध्ये कोरोनाचे कारण सांगितले गेले पण त्या काळामध्ये काही फेर पडून दोन दिवसात मंजूर करण्यात आले मग ते काही फेर मंजूर करण्यात मागे काय कारण होते यामागे काही चिरीमिरी प्रकार आहे का मला या प्रकरणांमध्ये मनस्ताप झाला आहे तलाठी कार्यालयातून निष्काळजीपणा दाखवला जात आहे 
---------------
बाबाजी नामदेव बढे
 माजी सैनिक