Breaking News

के.के. रेंज बाबत गोंधळ सुरूच, सैन्य दलाच्या वाहनातून अधिकार्‍यांनी गावांची केली पाहणी !

के.के. रेंज बाबत गोंधळ सुरूच, सैन्य दलाच्या वाहनातून अधिकार्‍यांनी गावांची केली पाहणी !
--------------
 के.के. रेंजसाठी जागा अधिग्रहणाच्या बाबत पुन्हा चर्चेने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
--------------
आमदार लंके यांची उद्या या संदर्भात बैठक वनकुटे सरपंच राहुल झावरे यांची माहिती.
पारनेर प्रतिनिधी :
        पारनेर तालुक्यातील के.के. रेंज क्षेत्र आर-२ सुरक्षा क्षेत्रामध्ये पारनेर तालुक्यातील ५ गावे आहेत या गावातील लोकांच्या मानगुटीवर के के रेंज ची टांगती तलवार अद्यापही आहे. वडगाव सावताळ गाजीपुर, पळशी या गावामध्ये दि ९ रोजी लष्कराचे अधिकारी अचानक येऊन पाहणी करत आहेत. याबाबत येथील नागरिकांना तसेच ग्रामपंचायतीला  कोणतीही पूर्वसूचना नाही. ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी याबाबत विचारणा केली तरी त्यांच्याकडून कुठलेही उत्तर मिळत नाही. लष्करी अधिकारी गावात आल्यानंतर ग्रामस्थ त्यांच्याभोवती जमा होत आहेत तसेच यामुळे गावात भितीयुक्त वातावरण पुन्हा निर्माण झाले आहे.
       यासंदर्भात आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून उद्या  बैठक आयोजित केलेली आहे अशी माहिती वनकुटे सरपंच राहुल झावरे यांनी दिली आहे. तसेच के के रेंज बाबतीत संघर्ष सुरूच ठेवणार आहे. लोकांनी भयभीत होऊ नये वेळप्रसंगी मोठे आंदोलन उभे करू आमदार निलेश लंके आपल्या पाठीशी खंबीर आहेत असे यावेळी राहुल झावरे यांनी सांगितले.
      के.के. रेंज क्षेत्र आर-२ सुरक्षा क्षेत्रामध्ये पारनेर तालुक्यातील ५  राहुरी १२ गावांचा तर नगर तालुक्यातील ६ गावांचा सहभाग आहे. पारनेर तालुक्यातील वनकुटे, पळशी, वडगाव सावताळ, गजदीपूर, ढवळपूरी नगर तालुक्यातील इस्लामपूर, सुजानपूर, नांदगाव, शिंगवे, घानेगाव, देहरे. राहुरी येथील मुळा धरणाच्या लगत असलेले बारागाव नांदूर, बाभूळगाव, ताहाराबाद, घोरपडवाडी, जांभूळबन, गाडकवाडी, कुरणवाडी, दरडगावथडी, वरवंडी, जांभळी, वावरथ, चिंचाळे, गडधे आखाडा व चिंचाळे या गावांचा समावेश आहे. अशा एकूण 23 गावांवर के.के.रेंज क्षेत्राची टांगती तलवार उभी आहे.
अधिग्रहण होणार की नाही याबाबत ग्रामस्थांना ठोस उत्तर मिळत नाही आहे. राजकीय नेते अधिग्रहण होणार नसल्याचे सांगत आहे. परंतु काही दिवसांपूर्वीच सैन्य दलाने २३ गावातील मालमत्तेची मुल्यांकण घेतले. त्यानंतर संबंधित क्षेत्रामध्ये असलेले उच्च प्रतिच्या मालमत्तेचा तपशिल महसूल विभागाकडून घेतला. यानंतर सैन्य दलाचे वाहने संबंधित गावामध्ये पाहणी करीत असल्याचे दिसून आले.
------------
    या प्रश्नासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. त्यावेळेस त्यांना संबंधित गावांची ग्रामसभेचे ठराव दिलेले आहेत. कोरोना काळामध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट झाली नाही. मात्र पुन्हा पवार साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जाईल. परिसरातील शेतकऱ्यांची एक इंचही जागा के के रेंज साठी जाऊ देणार नाही.
--------------
निलेश लंके 
(आमदार पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ)