Breaking News

कोपरगाव तालुक्यात ३३ कोरोना रुग्णाची भर !

कोपरगाव तालुक्यात ३३ कोरोना रुग्णाची भर
करंजी प्रतिनिधी- 
आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी कोपरगाव केअर सेन्टर मध्ये एकूण १९४ संशयितांची रॅपिड टेस्ट द्वारे तपासणी केली असता त्यात ३२ रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह सापडले तर नगर येथे पाठवलेल्या १६ अहवालापैकी १ पॉजिटीव्ह तर १५ निगेटीव्ह आले  असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
    यात रवंदे-७, जेऊर पाटोदा-३, टाकळी-३, कोळगाव थडी-१, संजीवनी कॉलनी-३, सोनारी-२, ब्राह्मणगाव-१, शिंगणापूर-१, येसगाव-१, पोहेगाव-४, कारवाडी-३, कोपरगाव शहर निवारा-१, चांदेकसारे-१, आचलगाव-१, टाकळी फाटा-१ असे एकूण ३३ कोरोना रुग्ण आज कोपरगाव तालुक्यात आढळून आले आहे.
 आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या ३१० झाली आहे तर २०० रुग्ण सध्या ऍक्टिव्ह असून कोरोनावर उपचाराधीन आहे तर आज रोजी कोरोना ला हारून पूर्ण पणे बरे झालेल्या एकूण २४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.