Breaking News

कृषी कन्येचे माती परीक्षणावर मार्गदर्शन !

कृषी कन्येचे  माती परीक्षणावर मार्गदर्शन !
देवळाली प्रवरा प्रतिनिधी :
      शेतीतील माती परीक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन विषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय संस्था संचलित कृषी महाविद्यालय भानसहिवरे येथील कृषी कन्या  स्वामिनी बाळासाहेब खुरुद हीचे 'ग्रामीण (कृषी) जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2020' या अभ्यासक्रमाचे देवळाली  प्रवरा मधील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 
         राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या गावात नगरपालिकेतर्फे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय संस्था संचलित कृषी महाविद्यालय भानसहिवरे येथील कृषी कन्या स्वामिनी बाळासाहेब खुरुद हीचे 'ग्रामीण (कृषी) जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2020' या अभ्यासक्रमाचे देवळाली  प्रवरा मध्ये आगमन झाले व गावातील अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.
 कृषि कन्या स्वामिनी खुरूद हिने पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून गावाविषयक माहिती मिळविली ही कृषि कन्या दहा आठवड्यांच्या कालावधीत शेतीतील माती परीक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन आणि सध्या कोरोना महामारी चालू आहे म्हणून शेतकऱ्यांना सुरक्षिततेचे उपाय, सामाजिक अंतर इत्यादी बाबत गावकऱ्यांशी संवाद साधणार आहे.
        कृषी कन्येला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.ए. दरंदले, कार्यक्रम  समन्वयक प्रा. एम.आर.माने,  कार्यक्रम अधिकारी सी.के.गाजरे,   पी.बी.काळे, इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभत असल्याची माहिती कृषिकन्येने  दिली. या प्रसंगी देवळाली प्रवरा नगराध्यक्ष  सत्यजित पा. कदम,  उपनगराध्यक्ष  प्रकाश संसारे तसेच नगरपालिका ममुख्याधिकारी अजित निकत , नगरसेवक आणि इतर शेतकरी उपस्थित होते.