Breaking News

पोखरीच्या कोतवालास लाच घेताना पकडले, पारनेर तालुक्यातील घटना !

पोखरीच्या कोतवालास लाच घेताना पकडले, पारनेर तालुक्यातील घटना !
पारनेर प्रतिनिधी - 
 पारनेर तालुक्यातील पोखरी येथील तलाठी कार्यालयातील कोतवालास लाचलुचपत विभागाने तीन हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.
 जुन्नर येथील नामदेव पवार यांच्या आईच्या जमिनी बाबत वारस नोंद करण्यासाठी तलाठी यांना दोन हजार व माझे हजार असे तीन हजारांची मागणी या कोतवालाने केली होती. मागणी  पडताळल्यानंतर लाचलुचपत विभागाने त्याला खिलारी पेट्रोल पंप टाकळी ढोकेश्वर येथे लाच स्विकारताना रंगेहात पकडले.
      गेल्या सहा महिन्या पासून नामदेव पवार हे वारस नोंदीसाठी
पोखरी तलाठी यांच्याकडे पाठपुरावा करत होते. त्यांचे काम होईना, तलाठी पैशांची मागणी करत,म्हणून त्यांनी पारनेर येथील लोकजागृती सामाजीक संस्थेकडे तक्रार केली होती. संस्थेने त्यांना लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी तक्रार केली होती.
हि कारवाई अ. नगर ACB यांनी केली आहे.