Breaking News

कोरोना योध्दा, कुळधरणचे डॉ. प्रशांत जगताप यांचा कोरोनाने मृत्यू !

कोरोना योध्दा, कुळधरणचे डॉ. प्रशांत जगताप यांचा कोरोनाने मृत्यू
कर्जत : प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील युवक डॉ. प्रशांत प्रमोद जगताप यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ते काही दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कुळधरण पंचक्रोशीसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
     नगर येथील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये ते रुग्णसेवा करीत होते. कोव्हिड सेंटरमधील कोरोना रुग्णांवर त्यांच्याकडून उपचार केले जात होते. मात्र तेथेच ते कोरोना बाधित झाले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी अंत झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.