Breaking News

सहजयोग ध्यान केल्यास मनातील भिती दूर होऊन निर्भयता निर्माण होते. - प्रा. नितीन पवार

सहजयोग ध्यान केल्यास मनातील भिती दूर होऊन निर्भयता निर्माण  होते.   -  प्रा. नितीन पवार
श्रीरामपूर -
    लोकडाऊन काळात नागरिक कोरोना विषाणू मुळे भयभीत झाले असून या परिस्तिथीतीत  सहजयोग ध्यान साधना केल्यास निर्भयता प्राप्त होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र सहजयोग प्रचार प्रसाराचे समन्वयक प्रा. नितीन पवार यांनी केले. 
     अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवाराच्या वतीने श्रीरामपूर येथे प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग ध्यान साधनेचे टोल फ्री क्रमांकाचे बॅनर व पोस्टरचे अनावरण प्रा. नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सध्याच्या काळामध्ये कोरोना विषाणू ला अद्याप पावेतो कोणतेही लस मिळाले नसल्यामुळे नागरिका मध्ये निर्माण झाली असून या परिस्थिती मध्ये नागरिकांना अभय देणे गरजेचे आहे.  या साठी नागरिकांनी सहजयोग ध्यान साधना नित्य नियमाने केल्यास त्यांच्या मधील भीती दूर होऊन निर्भयता निर्माण होते त्या मुळे नागरिक सुखी,  समाधान जिवन जगता येईल. सहजयोग ध्यान सध्या न्युज  इंडिया टी व्ही वर, यु ट्यूब तसेच टोल फ्री क्रमांक 180030700800 या क्रमांकावर  विनामूल्य माहिती दिली जाते याच लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्रीनिवास बोज्जा यांनी केले.  या  वेळी सर्व साधकांनी संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यात प्रत्येक गावा मध्ये सहजयोग प्रचार प्रसार करण्याचे नियोजन केले.  या वेळी  डॉक्टर भरत कडसकर,जिल्हा समन्वयक सुधीर सरोदे,  प्रचार प्रसार प्रमुख कुंडलिक ढाकणे, राम भवर,  रणजित बोरावके, सुरेश आगरकर, प्रा. साहेबराव रकटे, राजेंद्र दरंदले, मच्छिन्द्र मोरे,  बाळासाहेब सिन्नरकर, विजय लांडे, रवींद्र सोर, भागेश बोरा, निलेश नरोटे, गणेश भुजबळ, योगेश राऊत, अरविंद पवार,  अंबादास येन्नम,  श्रीनिवास बोज्जा,  विष्णू काळे,  उपस्थित होते.