Breaking News

साहित्यिक बबनराव लांडगे यांचे निधन !

साहित्यिक बबनराव लांडगे  यांचे निधनअकोले / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कळंब येथील रहिवासी व सेवानिवृत्त कृषी अधिकारी  व साहित्यिक
बबनराव मारुती लांडगे (वय ७४, वर्ष )  नुकतेच निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले  असा परिवार आहे जलसंपदा विभागाचे  चे सेवानिवृत्त सचिव रो .मा. लांडगे व  उद्योजक प्रभाकर लांडगे  यांचे ते  बंधू होते सेवानिवृत्त कृषी अधिकारी बबनराव लांडगे  यांनी 'बंडखोर कोंड्या नवला' ही कादंबरी लिहीली होती.स्वातंत्र्य चळवळी वर आधारित या कादंबरी चा  ललित रंगभूमी, पुणे यांनी २००७ मध्ये गौरव केला होता 'काही रानातील आणि काही
मनातील' कवितासंग्रह, 'फजितवाडी' आणि बोजवारा ' हे कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. शब्दगंध साहित्यिक परिषद, अहमदनगरचे ते आजीव सभासद होते.बबनराव लांडगे हाडाचे कलावंत होते. तमाशा कलेकडे त्यांची विशेष ओढ होती. तर ढोलकी मृदुंग, बासरी, हार्मोनियम यात त्यांचा हातखंडा होता. ग्रामीण निसर्ग हा त्यांच्या कलेचा पाया होता. निवृत्तीनंतर अलीकडेच ते त्यांच्या मायभूमीत (कळंब तालुका अकोले ) येथे
वास्तव्यास  होते.प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांनी  कधीच प्रयत्न केला नाही, त्यामुळे
ते अज्ञातवासात राहिले गेले आणि नुकतेच निसर्गाची जीवन गाणे गाणारा  हा कलावंत अचानक काळाच्या पडद्याआड गेला. 
--------