Breaking News

अहमदाबाद येथे कोविड सेंटरमध्ये लागली आग, ८ रुग्णांचा मृत्यू

Fire In Oil Factory Warehouse - आयल फैक्टरी के ...

अहमदाबाद ;

गुजरातमधील अहमदाबादमध्ये कोविड सेंटरला आज (६ ऑगस्ट) पहाटे आग लागल्याने ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरंगपुरा परिसराल्या श्रेय रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दरम्यान, काही रुग्णांना कोविड सेंटरमधून बाहेर काढण्यात यश आले आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळत आहे

कोविड-१९ सेंटरला आग लागल्याची माहिती कळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जणांना यातून वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सर्व रुग्णांना बाजूला असलेल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही आहे. मात्र, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.