Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांचा सत्कार !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांचा सत्कार !


करंजी प्रतिनिधी- 
कोपरगाव नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये देशात मानांकन मिळाल्याबद्दल आज कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष विजय वाहडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा सत्कार करण्यात आला.


    कोपरगाव नगरपरिषदेने देशात १८ वे, राज्यात १७ वे तर नाशिक विभागात १६ वे मानांकन मिळवल्याबद्दल आज आमदार  आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव 
 राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके,  नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, हिरामण गंगूले, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राजेंद्र जोशी, सोमनाथ आढाव, प्रताप गोसावी, विशाल निकम, समीर वर्पे यांनी सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या वेळी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आरने, अभियंता दिगंम्बर वाघ आदी उपस्थित होते.