Breaking News

त्या तलाठ्यांना परत येसगावातच रुजु करुन घ्या !

त्या तलाठ्यांना परत येसगावातच रुजु करुन घ्या !
----------
येसगाव ग्रामस्थांचे तहसिलदारांना निवेदन !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
     कोपरगाव तालुक्यातील रवंदे महसुल मंडळा अंतर्गत येणाऱ्या येसगाव तलाठी कार्यलयातील   महिला  कामगार तलाठी यांना गत महिन्यात लाचलुचपत प्रतिबंध टीमने पैसे घेताना पकडले माञ संबंधित  प्रकार हा काही लोकांनी जाणुनबुजुन वेगळ्या कामाचा वचपा काढण्यासाठी केला  त्यांना बडतर्फी केले  त्या तलाठ्यावर हा अन्याय असुन खरी वस्तूस्थिती वेगळीच आहे तरी  त्यांची बडतर्फीची आॕर्डर रद्द करुन त्यांना पुर्ववत येसगाव येथेच रुजु करुन घ्यावे अशा अशयाचे निवेदन येसगाव येथिल ग्रामस्थांनी तहसिलदार यांना दिले आहे.
     तहसिलदार यांच्याकडे   दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की येसगाव तलाठी सजा अंतर्गत खिर्डी गणेश ,अंचलगाव,नाटेगाव अशी चार गावे येतात येथे कार्यरत असलेल्या महिला तलाठ्यांविषयी  अद्यापपर्यत कोणाचीही कुठलीही  तक्रार नव्हती त्यांचे कामही चांगल्या प्रकारचे होते तरी त्यांची पूर्ववत येसगाव येथे नियुक्ती करावी असेही निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी म्हटले आहे निवेदनावर  विद्यमान सरपंचासह माजी सरपंच, मा.पोलिस पाटील यांच्यासह  पन्नास ग्रामस्थांच्या सह्या आहे.