Breaking News

पारनेर तालुक्यात आज ८ कोरोना पॉजिटीव्ह, पारनेर शहरातील ७ व्यक्तीचा समावेश !


पारनेर तालुक्यात ८ कोरोना  पॉजिटीव्ह, पारनेर शहरातील ७ व्यक्तीचा समावेश !
------------------
पारनेर तालुक्यातील 30 अहवाल निगेटिव्ह
पारनेर प्रतिनिधी- 
   पारनेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे आज प्राप्त झालेल्या शासकीय लॅबच्या अहवालानुसार ८ व्यक्तींना कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. आशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
यामध्ये पारनेर शहर ७ व भाळवणी १ या व्यक्तींचा पॉझिटिव अहवालात समावेश आहे तर तालुक्यातील निगेटिव्ह अहवालात पारनेर १३ पिंपळगाव रोठा १ वडगाव सावताळ १ पाबळ ३ जवळा ८ भाळवणी २ टाकळी ढोकेश्वर १ गांजीभोयरे १ असे 30 अहवाल निगेटिव्ह  प्राप्त झाले आहेत.
   ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कोरोना चाचणीत अहवालात आलेले आहेत तेथील १०० मीटर परिसर कंटेन्मेंट झोन घोषित केल्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.