Breaking News

बिग बींनी कोरोनाला हरवले, अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज !

बिग बींनी कोरोनाला हरवले, अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज !
मुंबई/ प्रतिनिधी
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. नुकतेच अभिनेता अभिषेक बच्चन यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता अमिताभ बच्चन हेही कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र अद्याप अभिषेक बच्चन यांच्या शरीरात कोरोनाचे काही विषाणू शिल्लक असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. 
‘मात्र माझ्या शरीरात कोरोनाचे काही विषाणू शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मी लवकरच कोरोनाला हरवून घरी परत येईल,’ असे ट्विट अभिषेक बच्चन यांनी केले आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ११ जुलै रोजी रात्री उशिरा समोर आली होती. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. दोघी पितापुत्रांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे होती. त्यामुळे त्यांना ११ जुलै रोजी रात्री मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी दुपारी म्हणजेच १२ जुलै रोजी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. १७ जुलैरोजी या दोघींना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
--------------------------------