Breaking News

पारनेर तालुक्यातील आज दिवसभरात ९ कोरोना बाधित, ४६ अहवाल निगेटिव्ह एकूण रुग्णांची संख्या ३५० पार !

पारनेर तालुक्यातील आज दिवसभरात ९ कोरोना बाधित, ४६ अहवाल निगेटिव्ह एकूण रुग्णांची संख्या ३५० पार !
पारनेर प्रतिनिधी- 
     पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज प्राप्त झालेल्या अहवाला नुसार नवीन ९ जणांना कोरोना ची बाधा झाली असल्याचे कोरोना चाचणी अहवालावरून निष्पन्न झाले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
     यामध्ये पारनेर शहरातील ३ मावळेवाडी १ पाबळ १ निघोज १ वेसदरे १ करंदी १ कार्जुले हर्या १ यांचा पॉजिटिव्ह अहवालात समावेश आहे.
तर तालुक्यातील पारनेर शहर २१ सुपा ३ करंदी ५ किंन्ही २ सारोळा अडवाई १ पाडळी १ कर्जुले हर्या १ रुई छत्रपती ५ जामगाव ५ भोयरे  गांगर्डा १ वडझिरे १ असे एकूण ४६ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत
तालुक्यात आज आठ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालामध्ये नऊ जणांना कोरोना ची बाधा झाली आहे.
     पारनेर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३५० पार झाली असून दररोज संख्या वाढत आहे ही तालुक्यातील जनतेसाठी चिंतेची बाब आहे.