Breaking News

रियाने सुशांतच्या खात्यातून कोट्यवधी उडवले !

रियाने सुशांतच्या खात्यातून कोट्यवधी उडवले!

- ईडीच्या चौकशीतून धक्कादायक बाबी चव्हाट्यावर
- रियाची ८ तास, तर तिच्या भावाची तब्बल १८ तांस चौकशी
मुंबई/प्रतिनिधी
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून, ईडीच्या चौकशीत रियाने धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांतच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्तीची ईडीने आठ तास चौकशी केली होती. यामध्ये रियाने सुशांतच्या सीएचेही नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. रियाने सुशांतचेच नाहीत तर त्याचा मोठ्या बहिणीच्या एफडीवरही डल्ला मारला आहे. रिया व सुशांतच्या सीएने त्याच्या खात्यातून अडीच कोटी रुपये उडविल्याची माहिती हाती आली आहे.
ईडीने रिया आणि तिच्या भावाला चौकशीला बोलावले होते. रियाची ८ तास आणि तिच्या भावाची दुसर्‍या दिवशी १८ तास चौकशी करण्यात आली. यामध्ये रियाने ईडीला सीएचे नाव घेत त्यांचाही यात सहभाग असल्याचे सांगितले. सुशांतने त्याच्या मोठ्या बहीणीच्या नावे साडेचार कोटी रुपयांची एफडी ठेवली होती. मात्र, रिया सुशांतच्या आयुष्यात आल्यानंतर दोन्ही सीए आणि तिच्या भावाने मिळून त्यातील अडीच कोटी रुपये गायब केले. यामुळे सुशांतच्या बहिणीच्या एफडीमध्ये केवळ दोन कोटी रुपयेच राहिले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. याशिवाय, ईडीला सुशांतची कंपनीचे व्यवहार, बँक खाती आणि त्यावरील रक्कमेचे अनेक संदिग्ध व्यवहार आढळले आहेत. यावर रियाला विचारले असता तिने उत्तर देणे टाळले. यामुळे सुशांतच्या वडिलांनी लावलेले आरोप खरे ठरू लागले आहेत. सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या खात्यात १७ कोटी रुपये होते, असा दावा केला होता. त्यावर सीएने हा दावा खोडला होता. आता ईडीच्या चौकशीमध्ये सारेकाही समोर येत आहे.
--------------------------