Breaking News

पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वर वाडी मंदिर परिसर १०० मीटर कंटेनमेंट झोन- तहसीलदार ज्योती देवरे यांचे आदेश !

पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वर वाडी मंदिर परिसर १०० मीटर कंटेनमेंट झोन- तहसीलदार ज्योती देवरे यांचे आदेश !
पारनेर प्रतिनिधी - 
    पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वर वाडी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये श्रावणी सोमवार निमित्त भाविक व पर्यटक मोठी गर्दी करत असतात मात्र यावर्षी कोरोना ची परिस्थितीत सर्व मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. सिद्धेश्वर मंदिर बंद आहे  मात्र तरीही पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वर वाडी परिसरामध्ये अनेकांनी गर्दी केली असल्याने तहसीलदार यांनी त्वरित तेथील १०० मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केल्यास गुन्हे दाखल केले जातील असे सांगितले आहे.
       तालुक्यात श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी सिद्धेश्वर वाडी येथील सिद्धेश्वर मंदिरामध्ये भाविक मोठी गर्दी करत असतात मात्र यावर्षी कोरोना संकट असल्याने गर्दीमुळे कोरोनाचा अधिक फैलाव होऊ शकतो तसेच तालुक्यातील कोरोना चे रुग्ण सध्या वाढत आहेत. तरीही नागरिकांनी येथे गर्दी केली होती प्रशासनाने यापूर्वीच मंदिरे व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. मात्र तरीही या ठिकाणी सोमवारी मोठी गर्दी झाल्या ने परिसर बंद करण्याचा आदेश तहसीलदार यांनी दिले तसेच या परिसरामध्ये सध्या पाऊस चांगला असल्याने निसर्ग फुलला आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांनी देखील गर्दी केली होती. तहसीलदार यांची कारवाईसाठी गाडी आलेली पाहताच पर्यटकांची मोठी धावपळ झाली. मंदिर उघडण्यास परवानगी नसताना नागरिकांनी सिद्धेश्वर वाडी परिसरात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे येथे १०० मीटर परिसरात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला तसेच या परिसरात कोणी आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले आहे.