Breaking News

प्रवरासंगम येथील अनधिकृत मुरुम उत्खनन दंड वसुलीची कारवाई करा - काकासाहेब गायके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

प्रवरासंगम येथील अनधिकृत मुरुम उत्खनन दंड वसुलीची कारवाई करा - काकासाहेब गायके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

नेवासा तालुका प्रतिनिधी :
   तालुक्यातील प्रवरासंगम येथील गट नंबर 157/26  मध्ये अनधिकृत मुरुम  व गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी  दंड वसुलीची कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
   जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात  श्री.गायके म्हणाले की, माहिती अधिकार अंतर्गत नेवासा तहसिल कार्यालयाने  मला दि.21 जुलै 2020 रोजी  दिलेल्या माहिती वरून  मौजे प्रवरासंगम येथील गट नं. 157/26 मध्ये बेकायदा मुरुम उत्खनन केलेले मला दिलेल्या माहितीवरुन दिसून येत आहे. परंतु आज रोजीपर्यंत कुठलाही दंड वसुली किंवा कारवाई केलेली दिसून येत नाही. तसेच नेवासा तहसिल कार्यालय यांच्या दि.4 जानेवारी 2017  च्या नोटीस वरुन असे दिसून येत आहे की, सदर गटामध्ये गौणखनिजासाठीची परवानगी घेतलेली नाही. तसेच सदर व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र
    जमीन महसूल अधिनियम  1966 चे कलम 48 (7) अन्वये महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेश दि.12 जून 2015  शासकीय गौण खनिज अनधिकृत उत्खनन केलेल्या माहितीवरुन दिसून येत आहे.  सदरचे क्षेत्र हे एका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांच्या ताब्यात असून त्यांचे ही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. तरी नियमानुसार दंड व कारवाई करण्यात यावी. अन्यथा मला न्यायालयात दाद मागण्याची वेळ येऊ देऊ नये असेही गायके यांनी स्पष्ट करुन या प्रकरणात शासनाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.त्यामुळे ही कारवाई त्वरीत करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली असून निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.