Breaking News

पाच कोटीचा अपहार केल्याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल !

पाच कोटीचा अपहार केल्याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल !
पारनेर प्रतिनिधी - 
      पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील मातोश्री सैनिक प्रतिष्ठानच्या खात्यामधून वाघोली जिल्हा पुणे येथिल जागेच्या व्यवहारापोटी ट्रस्टचे नावे  ५ कोटी रुपयाचा काढण्यात आलेला डिमांड ड्राफ्ट चा स्कॅन करून बँकेच्या अधिकारी यांच्याही बनवत सह्या करून ५ कोटी रकमेचा अपहार केल्या प्रकरणी फिर्याद किरण लक्ष्मण आहेर यांनी दिली असून पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ११ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर  यातील आरोपी भुवनेश्वर कुमार साल रा.चंदिगड, ऍड. अजय सिंग रा. चंदिगड, विशाल चव्हाण राहणार दिल्ली, अशोक भोपालसिंग चौधरी, जिमी अशोक चौधरी, दो.रा. घर.नं.७, मोहल्ला जापान घेर रामबाग बिजनोर राज्य उत्तर प्रदेश.यांनी फिर्यादी किरण लक्ष्मण आहेर, वय ३७ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. आणे, ता जुन्नर, जिल्हा पुणे. हे टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे खाते क्रमांक ३१ २६ १८ ०८ १५७ मधून वाघोली जिल्हा पुणे येथील खरेदी करावयाच्या जागेच्या व्यवहारा पोटी भुवनेश कुमार साल व विशाल चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे हनुमंत अलवर स्थल ट्रस्टचे नावे ५ कोटी रुपयाचा काढण्यात आलेला डिमांड ड्राफ्ट क्रमांक शहर ४० ६६ ७९ स्कॅन छायांकित प्रत ही फिर्यादी यांनी ऍड अजय सिंह यांचे ई-मेलवर पाठविण्यात आलेली असताना ती अजयसिंह व भुवनेश्वर साल व विशाल चव्हाण व हनुमत अलवर दव्य स्थल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक भोपाल सिंग चौधरी व जेमी अशोक चौधरी यांनी संगनमताने फिर्यादीची फसवणूक व्हावी या हेतूने मांडरची बनावट प्रत तयार करून त्याचे वर बँकेचे अधिकारी यांच्याही बनावट सह्या करून डिमांड ड्राफ्ट क्रमांक ४६ ६६ ७९ हा दिनांक १५ फेब्रुवारी रोजी आयडीबीआय बँक बिजनोर सिटी राज्य उत्तर प्रदेश येथील खाते क्रमांक ०२४ ६१० २००००० ८३ ४१ यामध्ये फिर्यादीचे संमतीशिवाय व  फिर्यादीची फसवणूक करून पाच कोटी रकमेचा अपहार केलेला आहे 
याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी हे करत आहेत.