Breaking News

कोपरगाव तालुक्यात आज परत ११ रुग्ण !

कोपरगाव तालुक्यात आज परत ११ रुग्ण !
करंजी प्रतिनिधी-
    आज रोजी कोपरगाव कोविड सेन्टर मध्ये ५२ संशयित लोकांची रॅपिड अँटीझेन टेस्ट केली असता त्यात ११ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर श्री कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
      यात कोपरगाव तालुक्यातील चासनळी जवळील मंजूर गावातील एक ६० वर्षीय महिला व पढेगाव येथे १  कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे.
   तर शहरात एकूण ९ रुग्ण सापडले असून यात बँक रोड-२, स्वामी समर्थ नगर-२, इंदिरा नगर-१,  गांधीनगर-२,सुभाष नगर-१ व बैल बाजार परिसरात १ असे एकूण ९ रुग्ण शहरात सापडले असून ३० जणांचे स्वाब पुढील तपासणीसाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.