Breaking News

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुपा ३ दिवस बंद, तहसीलदार देवरे यांचे आदेश !

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुपा ३ दिवस बंद !
-----------
पारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे यांचे आदेश !
----------


पारनेर प्रतिनिधी - 
     पारनेर तालुक्यातील सुपा येथे कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता तहसीलदार ज्योती देवरे यांनी त्वरित सुपा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये सोशल डिस्टन चे पालन होत नाही तसेच शासनाने घालून दिलेल्या कोणत्याही नियमावलीचे पालन नागरिक करत नाहीत म्हणून तीन दिवसांसाठी सुपा हे गाव पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
    सुपा येथे आज प्राप्त झालेले चार अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तसेच काही अहवाल लॅबमध्ये प्रलंबित आहेत व आरोग्य विभागामार्फत अजूनही संपर्कात आलेल्या रुग्णांचा शोध सुरू आहे. यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे म्हणून सुपा तीन दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यान लक्षणे दिसत असल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे.