Breaking News

देवीभोयरे येथे दहा जणांना जुगार खेळताना पोलिसांनी पकडले !

देवीभोयरे येथे दहा जणांना जुगार खेळताना पोलिसांनी पकडले


पारनेर प्रतिनिधी -
     पारनेर तालुक्यातील देवीभोयरे गावात मराठी शाळेच्या पाठीमागे जुगार खेळताना 10 जणांविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून 8310 रुपये ची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
     याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवीभोयरे गावात मराठी शाळेच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये देवीभोयरे तालुका पारनेर येथे आरोपी  गोविंद शामराव पवार वय 39 दीपक एकनाथ साळवे वय 42 शरद बबन बोरुडे वय 40 भानुदास गणपत केदारे वय 54 सुनील आबु साठे वय 41 बाळू शामराव ससाणे वय 40 रवींद्र पांडुरंग गाजरे वय 37 रमेश सुदाम पोपळघट वय 39 आनंदा भिका सुरडे वय 54 सर्व रा देवीभोयरे ता पारनेर  कोंडीबा रामचंद्र वरखडे वय 60 रा निघोज ता पारनेर हे विनापरवाना बेकायदा तिरट नावाचा हारजीतीचा जुगार खेळताना 8310 रु रोख रक्कम व जुगाराच्या साहित्यासह पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आढळून आले त्यांना ताब्यात घेतले  आहे याबाबतची फिर्याद पो.ना. विश्वास अर्जुन बेरड स्था. गु. शा.  जि. अहमदनगर यांनी दिली त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास  पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.  एस व्ही गुजर हे करत आहेत.