Breaking News

राममंदिरभुमीपुजन हा आजचा दिवस ऐतिहासिक - संजय किर्तने

राममंदिरभुमीपुजन हा आजचा दिवस  ऐतिहासिक - संजय किर्तने
पाथर्डी प्रतिनिधी :
      आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी खास आहे. कारण सर्व हिंदू धर्माची आस्था श्रीरामप्रभू  यांचे आयोध्या नगरीत  पंतप्रधान  यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे.आज आमचे सर्वाचे स्वप्न पूर्ण होत आहे असे भाजपाचे तालुका अध्यक्ष संजय भाऊ किर्तने यांनी म्हटले आहे.
    उत्सुकता आज अयोध्येमधील लोकांमध्ये भूमिपूजनाविषयी आहे. याच पार्श्वभूमीवर लोकप्रिय लोकनेत्या पंकजा गोपीनाथ मुंढे यांनी रामप्रभूमीची प्रतिमा रेखाटून सर्वाचाच उत्साह वाढवला आहे, व शुभेच्छा दिल्या आहेत. रामनामाची धून गात आज घरोघरी प्रभू श्रीरामांना अभिवादन केले जात आहे. संपूर्ण अयोध्यानगरी भूमिपूजनाच्या शुभ मुहूर्तामध्ये सामील होण्यास सज्ज आहे. कोरोनामुळे लोकांना या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता येणार नाहीये, परंतु घराच्या अंगणात रांगोळी आणि छतावर भगवा ध्वज लावून नागरिक या सोहळ्यात सहभाग नोंदवित आहेत.
       श्रीराम जन्मस्थळापासून २-४ किलोमीटर अंतरावर राहणा-या लोकांनी टीव्हीद्वारे महोत्सवात सामील होण्याची योजनादेखील बनविली आहे. ५ ऑगस्टचा दिवस उत्साहवर्धक वातावरणात अयोध्येतील मंदिरे गजबजू लागली आहेत. संपूर्ण अयोध्यामध्ये भूमिपूजनाच्या आजच्या दिवशी ५५ हजार किलो देशी तूपापासून बनवलेल्या १४ लाख लाडूंचे वाटप करण्याची योजना आहे.