Breaking News

श्री वामानभाऊ विद्यालयातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

श्री वामानभाऊ विद्यालयातील  दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !
पाथर्डी :
एकलव्य शिक्षण संस्थेच्या श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपूर पांगूळ येथे इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता .याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी कु.बडे सोनाली शहादेव  ८८.८० % प्रथम क्रमांक, कु.ढाकणे पूजा अजिनाथ ८७.२०% द्वितीय क्रमांक, कु. बडे गायत्री शहादेव ८६.६० % तृतीय क्रमांक ,चि. बडे राहुल अशोक ८६.४० %चतुर्थ क्रमांक मिळविला आहे .यावेळी  विद्यार्थ्यांचा पालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य आहे .आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे प्रतिपादन मुख्याध्यापक श्री संजय घिगे यांनी केले .
तसेच विद्यालयाचा निकाल ९६.८७ %इतका इतका लागला असून अनेक विद्यार्थ्यांनी विशेष  योग्यता  श्रेणी मिळवली आहे .असे मुख्याध्यापक घिगे यांनी सांगितले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव अँड श्री. प्रताप काका ढाकणे, जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रभावतीताई ढाकणे यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षक व उत्तीर्ण  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी श्री.शहादेव बडे,श्री अशोक बडे,श्री.अर्जुन केदार,श्री.डॉ.संजय उदमले, श्री. कैलास वेलदोडे,श्री.विजय कुदळ, श्री.बाळासाहेब दहीफळे, श्री.प्रकाश तुपे,श्री.बाळासाहेब म्हस्के, श्री.बाबासाहेब राजगुरू,आदी उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवाजी मरकड यांनी तर आभार श्री .बाळासाहेब घुले यांनी मानले.