Breaking News

पारनेर तालुक्यात आज २ कोरोना बाधित, पारनेर शहरातील वरखेड मळा येथील १ तरुण बाधित !

पारनेर तालुक्यात आज २ कोरोना बाधित, पारनेर शहरातील वरखेड मळा येथील १ तरुण बाधित !
तालुक्यातील 29 अहवाल निगिटिव्ह 
पारनेर प्रतिनिधी -
   पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालात दोन व्यक्ती पुन्हा कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
     यात पारनेर शहरातील  २६ वर्षीय तरुणाचा व पिंपळगाव तुर्क येथील ३४ तरुणाचा पॉझिटिव मध्ये समावेश आहे.
तर तालुक्यातील पारनेर १७ रायतळे ३ नांदूर पठार ३ वडझिरे २ कळस २ दैठणे गुंजाळ १ सांगवी सूर्य १ असे २९ अहवाल निगिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
ज्या ठिकाणी कोरोना बाधित व्यक्ती सापडले आहेत तो १०० मीटर परिसर १४ दिवस कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहे.